वेदना आणि सुखाचे तत्व
(Pain & pleasure principle)
जगप्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर एका मुलाखतीत सांगत होता, जेव्हा तो वानखेडे स्टेडियम वर आचरेकर सरांच्याकडे सराव करायला दररोज सायंकाळी जात असे तेव्हा तो पाहत असे की त्याच्याच वयाची मुले मैदानाबाहेर मौजमजा करण्यात, भेळपुरी-पाणीपुरी खाण्यात दंग असायची त्याला सुद्धा हे सर्व करायची खूप इच्छा होत असे पण भविष्यात त्याचे तोटेही त्याला दिसत होते आणि म्हणूनच सचिनने मनमारुन खेळावर अधिक लक्ष दिले.सचिनच्या या निर्णयाचे फलित संपूर्ण जगाने पाहिले आहे. सचिनच्या जीवनातील या घटनेतून वेदना आणि सुखाचे तत्व समोर येते.
काय आहे हे तत्व?प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनात हे कसे वापरते? याचे महत्त्व काय? हे समजावून घेण्यासाठी दररोज घडणारी काही उदाहरणे पाहुयात,
तुम्ही आजारी असताना (खास करून थंडी तापाने) कितीही वाटलं तरी आईस्क्रीम खाणं टाळता का?
परीक्षेच्या काळात झोप कमी घेता का?
कडाक्याच्या थंडीत सुद्धा मॉर्निंग वॉकला जाता का?
वरील प्रश्नांसाठी तुमचे उत्तर 'हो' असेल तर तुम्ही वेदना आणि सुख तत्वाला जवळून ओळखताय. माणसाकडून घेतल्या जाणाऱ्या प्रत्येक निर्णय व कृतीमागे हे तत्व असते.व्यक्ती दिवसागणिक अंदाजे 35000 निर्णय घेत असते पण यातील बहुतांशी निर्णय व त्यानुसार केले जाणारे वर्तन सवयीचे झालेले असते.ते अजाणतेपणी होत असते शिवाय त्यांचे परिणामही सवयीचे झालेले असतात त्यामुळे त्यांचा जीवनावर पडणाऱ्या प्रभावाची माणसाला फारशी जाणीव असत नाही. पण व्यक्तीकडून जाणीवपूर्वक घेतल्या जाणाऱ्या निर्णयामागे व कृतीमागे व्यक्ती वेदना व सुख तत्वाकडे विचारपूर्वक पाहत असते.
मानवाचे मन हे नेहमीच वेदनेला टाळण्याच्या व सुखप्राप्तीच्या प्रयत्नात असते.ते बऱ्याचदा वर्तमानातील सुखाचा ध्यास घेत असते, पण त्याचवेळी फार कमी वेळा भविष्यात काय परिणामांना सामोरे जावे लागेल याचा विचार करते.व्यक्तीकडून अजाणतेपणी घेतल्या जाणाऱ्या निर्णयामुळे व वर्तनामुळे व्यक्तीला त्याच त्या प्रतिकूल परिणामांना सामोरे जावे लागते तथापि भविष्यात या परिणामात अनुकूलता आणून सुख प्राप्त करणेसाठी प्रचलित धारणा, विचार पद्धती, निर्णय प्रक्रिया व वर्तनामध्ये म्हणजेच प्रस्थापित प्रणालीमध्ये अनुरूप बदल करताना होणाऱ्या वेदनांचा स्वीकार करणे यास वेदना आणि सुखाचे तत्व म्हणतात.थोडक्यात भविष्यात सुखप्राप्ती व्हावी म्हणून वर्तमानात मनाच्या इच्छेविरुद्ध,आवडी विरुद्ध जाऊन इच्छित सुखासाठी आवश्यक ती क्रिया करणे होय.वेदना आणि सुखाचे तत्व व्यक्तीला आपले निर्णय आणि वर्तन यांच्याकडे जागरूकपणे पाहण्यास भाग पाडते आणि व्यक्तींमधील आमूलाग्र परिवर्तनास निश्चित दिशा देते.
तुमच्या वर्तमानकालीन जीवनात तुम्हाला ज्या ज्या गोष्टींपासून सुख प्राप्त होते आहे त्या सर्वांमागे भूतकाळात तुम्ही अल्पकालीन वेदनेचा निश्चितच अनुभव घेतला असणार आणि तुम्हाला आता ज्या ज्या गोष्टींचा पश्चाताप होतो त्या सर्वांमागे तुम्ही भूतकाळात अल्पकालीन सुखाला निश्चितच बळी पडलेले असणार यात शंका नाही.
कित्येकदा व्यक्ती अल्पकालीन सुखाला बळी पडते व त्या करिता त्यास दीर्घकालीन वेदनेला सामोरे जावे लागते च्यापेक्षा त्या क्षणात व्यक्ती जर का जागरूक राहिली व वर्तनाचा भविष्यातील परिणाम पाहिला आणि वर्तन बदल करून अल्पकालीन वेदनेचा स्वीकार केला तर व्यक्तीस दीर्घकालीन सुख प्राप्ती होऊ शकते.
Pain(as is)...................Pleasure (as when)
Mr. Abhijeet Manav.
(Mind trainer & NLP practitioner)

Very true and applied
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteखूप सुंदर... अतिशय योग्य शब्दांत आणि मानवी वर्तन सकारात्मक आणि जागरूक राहून केल्यास होणारे भविष्यातील आनंदरूपी फायदे छान शब्दबद्द केलेत.
ReplyDeleteआभारी आहे.
DeleteMind blowing,eye opwner blog to Neurological illertate people
ReplyDeleteReally good and applicable in our life
ReplyDelete