Saturday, 22 December 2018

DOG ON THE NAIL

                     खिळा (डॉग ऑन द नेल)             
                   जॉन नवीनच शिफ्ट झालेल्या घराच्या परसबागेत आनंदाने फेऱ्या मारत होता. बराच वेळ गेल्यानंतर त्याच्या लक्षात आले की शेजारील घराच्या अंगणातून एका कुत्र्याचा विव्हवळण्याचा तर  मध्येच जोरात रडण्याचा आवाज येत होता पण जॉनने त्याकडे दुर्लक्ष केले. दुसऱ्या दिवशीही जॉनला तोच आवाज पुन्हा ऐकायला आला. जॉनने पुन्हा दुर्लक्ष केले. असे दररोजच होऊ लागले वारंवार कुत्र्याच्या ओरडण्यामुळे जॉन चांगलाच संतापला व शेवटी स्वतःच शेजारील घरातील कुत्र्याला  नेमकं काय झालंय हे पाहण्याच्या निर्धाराने तो लगोलग शेजारी पोहचला. त्याने पाहिलं की त्याचा शेजारी आणि त्यांचा ओरडणारा कुत्रा एकाच बाकावर बसले होते. नेहमी प्रमाणे कुत्रा विव्हळत होता तर शेजारी मात्र शांतपणे वर्तमानपत्र वाचत होता,हे पाहून जॉनला थोडं आश्चर्य वाटलं. त्याने शेजाऱ्यास कुत्र्याच्या वारंवार ओरडण्याचे कारण विचारले असता कुत्रा एका खिळ्यावर बसला असून तो खिळा त्यास बोचत असल्याचे सांगितले गेले. जॉनने कुत्र्यास खिळा बोचत असूनही तो जागा का बदलत नाही याचे आश्चर्य वाटले व त्याने त्या संबंधीही विचारणा केली.शेजाऱ्याने कुत्र्याकडे पाहिले व म्हणाला कदाचित त्यास खिळा अजून तितकासा बोचत नसावा.
      किती मजेशीर पण वास्तव सांगणारी गोष्ट आहे ना! आपल्याही जीवनात असे कित्येक खिळे आपणास सतत बोचत असतात. वेदना देत असतात. असे कोणतेही खिळे असू शकतात जसे नात्यांमधील हेवे दाव्यांचे असतील,आर्थिक टंचाईचे असतील,व्यक्तिगत जीवनातील मानसिक वा शारीरिक आरोग्याच्या पातळीवरील असतील,नोकरी वा व्यवसायातील असतील यासोबतच दररोजच्या जीवनातील व्यवहारातून निर्माण होणारे ताणतणाव, निराशा,उदासीनता,चंचलता वा दुःखाचेही असतील पण आपण मात्र या खिळ्यांची बोचण्याची तीव्रता कितीही असली तरी आपणास ती कधीच जाणवत नाही व जीवन असंच निराशेने,दुःखाने ग्रासलेले असते व असं घडणं सहजच आहे असा विचार करून रडत,कुंठत,तक्रारी करत आणि कपाळमोक्ष करत जगत असतो,पण जो कोणी वेळेवर हे बोचणारे खिळे ओळखतो व त्यावर योग्य उपाय योजना करतो तो मात्र जीवनाचा खरा आस्वाद घेतो यात शंका नाही.

Mr.Abhijeet Manav.
(Mind trainer & NLP practitioner)

4 comments: