स्वयं-प्रेरणा
(Self-Motivation)
प्रत्येक सजीव जगण्यासाठी आवश्यक गोष्टींसाठी सतत धडपडत असतो. माणूस मात्र इतर सजीवांपेक्षा वेगळा आहे. तो मूलभूत गरजा म्हणजेच अन्न, वस्त्र आणि निवारा यापलीकडे जाऊन जगण्याला उचित अर्थ प्राप्तीसाठी झटत असतो. भौतिक वस्तू पासून समाजात मान सन्मान, प्रेम,प्रशंसा,सुरक्षितता ते आत्मज्ञाना सारख्या अध्यात्मिक सुख प्राप्तीसाठी तो धडपडत असतो. या धडपडीमागे जी ऊर्जा असते,ताकद असते त्यास प्रेरणा असे म्हणतात.कोणतेही काम तडीस जाण्यासाठी त्यामागील नेमकी प्रेरणा काय आहे हे खूप महत्त्वाचे असते. माणसाचे वर्तन हे त्यामागील प्रेरणेने घडत असते. ज्याला इंग्रजी भाषेत मोटिव्हेशन म्हणतात आणि आजकाल प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या मार्गाने हे प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत असतो.
मोटिव्हेशन दोन प्रकारे मिळते एक म्हणजे जे व्यक्तीच्या आतून निर्माण होते ज्यास स्वयंप्रेरणा(सेल्फ मोटिव्हेशन) असे म्हणतात तर दुसरे म्हणजे जे बाहेरील व्यक्ती किंवा घटना यापासून मिळते त्यास बाह्य प्रेरणा म्हणतात. वास्तविक बाह्य प्रेरणादायी घटक व्यक्तीला यशाच्या मार्गावर चालण्यास उद्युक्त करतात पण ते जास्त काळ टिकणारे असत नाहीत आणि म्हणूनच बऱ्याचदा एखादे पुस्तक वाचून, एखाद्या प्रेरणादायी वक्त्याला ऐकून, एखादा मोटिव्हेशनल व्हिडीओ पाहून वा काही यशस्वी लोकांना भेटून आपण एखादे कार्य करण्यास सिद्ध होतो. काही दिवस त्या कार्यास वाहून घेतो पण, गाडी कधी रुळावरून घसरते व इतरत्र भटकते ते कळतही नाही आणि मग मागे तसेच पुढे अस जीवन चालायला लागत. बाह्य प्रेरणा आवश्यक आहेच पण च्याही पेक्षा ठरविलेले कार्य सिद्धीस नेणे करीता स्वयं प्रेरणा ( सेल्फ मोटिव्हेशन) खूप आवश्यक आहे. जगातील सर्व यशस्वी लोकांच्या यशा मागे स्वयं प्रेरणा हा मूलभूत घटक आहे यात शंका नाही.
जीवनात नवनवीन संधी निर्माण करण्यासोबतच यशाच्या मार्गावर चालताना येणाऱ्या सर्व आव्हानांना सामोरे जाण्यासाठी, कठीण काळातही मनाला उभारी येण्यासाठी,सकारत्मक दृष्टिकोन ठेऊन आत्मविश्वासपूर्वक यशोशिखरावर चढाई करणेसाठी स्वयंप्रेरणा अत्यावश्यक असते. अलीकडे लोकांच्याकडे बाह्य प्रेरणेचे अनेक स्रोत आहेत पण प्रत्येकाला स्वयं प्रेरणेची केव्हा ना केव्हा तरी कमतरता जाणवतेच किंबहूना कमतरता आहेच असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अशी ही अत्यावश्यक असणारी स्वयं प्रेरणा स्वतःमध्ये निर्माण करणेसाठी खलील गोष्टी तुम्हाला निश्चित मदत करतील.
जीवन हेतू निश्चित करा:-
जगण्याचा हेतू (purpose)हा स्वयं प्रेरणेचा मूळ स्रोत आहे. हेतू जगण्याला निश्चित आकार देत असतो. तो उदात्त असतो. तो जीवनाला परिपूर्णतेकडे घेऊन जाणारा असतो. जीवन हेतूच तुमच्यातील स्वयं प्रेरणेचा स्रोत प्रवाहित करेल.
स्वतःला ओळखा:-
आपली स्वतःची ओळख म्हणजे केवळ आपले नाव असत नाही तर आपले विचार,दृष्टिकोन, धारणा आणि वर्तन हीच आपली खरी ओळख असते. स्वतःच्या विचारांची, गुण -दोषांची, सामर्थ्या सोबतच कमकुवतपणाची ही ओळख होणे आवश्यक आहे. स्वतःतील क्षमतांची जाणीव झाल्यास एखादे कार्य करण्यास आतूनच प्रेरणा मिळते.
मोठं ध्येय बाळगा:-
ध्येय तुमच्या जगण्याला गती देते. तुमच्यातील क्षमतांचा पुरेपूर वापर होण्यासाठी व ध्येय प्राप्तीच्या उत्कटतेने स्वयं प्रेरीत होण्यासाठी तुमच्या समोर मोठं ध्येय असायलाच पाहिजे. तुम्हाला कम्फर्ट झोनच्या बाहेर काढणारे ध्येय अधिक स्वयं प्रेरित करणारे असते. ध्येय गाठण्यासाठी आपण सतत कार्यरत असायला हवे या भावनेतून व्यक्ती सेल्फ मोटिव्हेटेड होतो.
प्रगतीचा मागोवा घ्या:-
ध्येय प्राप्तीच्या मार्गावर चालत असताना तुम्ही नेहमीच प्रगती करत असता.बऱ्याचदा ती लक्षात न येण्याजोगी असते तर कधी पटकन लक्षात येणारी असते. तुम्ही जर वारंवार तिचा मागोवा घेत राहिलात तर तुमचा आत्मविश्वास वाढेल शिवाय सतत बदलत राहण्याची स्वयं प्रेरणा देखील निर्माण होईल.
जबाबदारी घ्या:-
तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात हे तुम्ही ओळखायला हवं. तुमच्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक घटनेस व त्यातून निर्मित प्रत्येक परिणामास तुम्हीच जबाबदार आहत हे सत्य स्वीकारायला पाहिजे. जीवनाची सर्वस्वी जबाबदारी घेतल्याने व्यक्ती अपेक्षित परिणाम प्राप्ती करीता स्वयं प्रेरित होऊन कार्य करतो.
स्वयं प्रेरीत लोकांसोबत रहा:-
तुमच्यावरती परिसराचा नेहमीच प्रभाव असतो. तुम्ही नेहमी स्वयं प्रेरित लोकांसोबत राहिलात तर तुम्ही ही स्वयं प्रेरित बनाल.अशा सेल्फ मोटिव्हेटेड लोकांच्या वागण्या-बोलण्यातून,विचारांतून, दृष्टिकोनातून तुम्हीही सेल्फ मोटिव्हेटेड व्हाल.
सतत शिकत रहा:-
सतत नवीन काहीतरी शिकण्याचा व स्वतःला सतत अपग्रेड ठेवण्याचा दृष्टिकोन तुम्हाला स्वयंप्रेरीत बनवेल. ही वृत्ती तुमचे मन आणि शरीर दोन्हीही तत्पर ठेवेल.
स्वयं प्रेरीत व्यक्तीच जीवनाला योग्य आकार देऊ शकते. सुखी, समाधानी व आनंदी जीवनासाठी तुम्ही स्वयं प्रेरीत व्हावे हीच सदिच्छा!!!
💐💐💐💐
लेखन:-
श्री. अभिजीत मानव
(सर्टिफाईड एन.एल.पी.प्रॅक्टिशनर,
सर्टिफाईड लाईफ कोच,
माईंड ट्रेनर आणि प्रेरणादायी वक्ते)
9503839760
www.exceltrainings.in
http://abhijeetmanav.blogspot.com