धारणा( Empower your beliefs)
भल्यामोठ्या हत्तीला छोटयाशा साखळीने बांधून ठेवलं जातं व त्यास साखळी तोडणं शक्य असतानाही, तो हतबल होऊन त्या नाजूक साखळीशी आयुष्यभर बांधला जातो ही गोष्ट आपणा सर्वांनाच माहीत आहे. हे सर्वज्ञात आहे की, त्या प्रकारची साखळी हत्तीला आता बांधली गेली तर तो सहज तोडून देईल पण जी साखळी तो तोडू शकत नाही ती त्यास लहान असतानाच बांधली गेली होती तत्कालीन स्थितीत त्याने साखळी तोडण्याचा अनेकदा प्रयत्न केलेला असतो पण तो साखळी तोडण्यास शारीरिक दृष्ट्या अक्षम असल्यामुळे साखळी तोडू शकत नव्हता.अनेकदा प्रयत्न करूनही साखळी तोडण्यात अपयश आल्यामुळे, आपण ही साखळी कधीच तोडू शकत नाही असा त्याचा पक्का विचार बनला होता व त्या बरहुकूम त्याचे वर्तन घडत होते की जे कमजोर,अनपेक्षित, व तर्कविसंगत असे होते. मनाशी घट्ट केलेल्या मतामुळेच हत्ती कमकुवत व अनपेक्षित वर्तन करत होता. या गोष्टीतल्या हत्तीने साखळी बद्दल बनविलेल्या मतास धारणा असे म्हणतात.अशा कमकुवत धारणेमुळेच हत्ती कमकुवत बनला होता. शारीरिक सक्षमता असूनही केवळ मर्यादित धारणेमुळे तो हतबल झाला होता.
व्यक्तीचा विचार, त्याचा स्वतः सह जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन व त्याच्या कडून केले जाणारे प्रत्येक वर्तन या सर्वांचे मूळ हे व्यक्तीच्या धारणांमध्ये असते. धारणा या जणू काही जगण्याचे अलिखित नियमच असतात की ज्यांना अनुसरूनच व्यक्तीचा वर्तनव्यवहार होत असतो. धारणा म्हणजे व्यक्तीला स्वतःशी व बाह्यजगाशी व्यवहार करण्यास प्रेरणा देणारे व दिशादर्शन करणारे जणू होकायंत्रच असतात.व्यक्तीला येणाऱ्या प्रत्येक घटनेतील अनुभव व त्याची तीव्रता ही त्या घटनेकडे पाहण्याच्या व त्या बद्दल विचार करण्या मागील धारणेवरच अवलंबून असते.व्यक्तीच्या जीवनातील यशापयश, नात्यांमधील सुख-दुःख,सकारात्मकता- नकारात्मकता,सक्षमता-अक्षमता,उत्साह-निरुत्साह आणि बरच काही व्यक्तीने कोणत्या धारणांना जवळ बाळगले आहे त्यावरून ठरते यात शंका नाही आणि म्हणूनच व्यक्ती वर्तनातील व वर्तन निर्मित परिस्थितीतील आमूलाग्र बदल हा व्यक्तींमधील धारणांतील संपूर्ण बदलाशिवाय शक्य नाही.
साधारणपणे व्यक्तीच्या धारणा या तिच्या लहानपणातच तयार झालेल्या असतात.व्यक्तीला मिळणारे कौटुंबिक-सामाजिक- शालेय वातावरण यांचा धारणा बनण्यात महत्वपूर्ण वाटा आहे. व्यक्तीला अजाणतेपणी मिळणाऱ्या शिकवणीतून व व्यक्तीने सभोवतालच्या वातावरणाचे निरीक्षण करून, अनुकरण करून स्वतःमध्ये धारणांची पेरणी केलेली असते.एकदा धारणा तयार झाल्या की बऱ्याचदा व्यक्ती त्यामध्ये बदल करण्याचा विचार करत नाही सबब होतं असे की व्यक्तीला सदर धारणाधारीत वर्तनाचे तेच तेच परिणाम येतात आणि व्यक्ती त्यास आपलं भाग्य समजते पर्यायाने स्वभाव बदलता येत नाही किंवा स्वभावाला औषध नसतं अशा प्रकारच्या मानवी विकासाला,बदलाला व अमर्यादित शक्तीला लगाम लावणाऱ्या अक्षम धारणांची निर्मिती करते. आपल्याकडे तर असं म्हटलं जातं की व्यक्तीच नशिब अगोदरच लिहून ठेवलेलं असतं त्यामुळे जीवनात जे काही वाट्याला येईल ते भोगाव लागतं, व्यक्तीच्या नियंत्रणात काहीच असत नाही,अशा धारणा व्यक्तीला निराशावादी,परावलंबी व निष्क्रिय बनवतात पण आनंदाची गोष्ट अशी आहे की व्यक्तीला आपल्या धारणांमध्ये हवा तसा बदल करता येतो पर्यायानें आपले विचार, दृष्टिकोन, भावनांचे प्रकटीकरण व वर्तनात 360 अंशात परिवर्तन करून आपले जीवन सुखी, आनंदी व समाधानी बनवता येते. त्याकरिता गरज आहे, आपणास अपयशी करणाऱ्या वर्तन व विचारांची ओळख होण्याची व त्यामागील आपल्यातील अलौकिक सामर्थ्याला मर्यादित करणाऱ्या धारणांची जाणीव होण्याची. चला तर मग स्वतःला अमर्यादित सामर्थ्यशाली बनवूया......
*Let's empower yourself by imbibing empowering beliefs in yourself.
Mr.Abhijeet Manav.
(Mind trainer and NLP practitioner)

Nice and selfexplanatory which need not any explanation
ReplyDeleteReally effective👍👍
ReplyDelete